सांगोला तालुक्यात जमीन खरेदी व्यवहारात तब्बल ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात फिर्यादी गौरव सुनील चांडोले (वय ३१, व्यवसाय वकील , रा. वासुद चौक , सांगोला ) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या जबाबानुसार , आरोपी अशांक बाळकृष्ण चांदणे (रा. वासुद रोड , सांगोला ) यांनी मौजे वासुद शिवारातील गट क्र . १५०/२ व गट क्र . १४८/२ या शेतजमिनीचे बनावट बिगरशेती आदेश दाखवून विक्रीसाठी कागदपत्रे तयार केली या व्यवहारात सतीश रावसाहेब सावंत व राहुल शिवलाल बंदपट्टे यांच्यासह फिर्यादीने मिळून २२ फेब्रुवारी २०२१ रोजी खरेदी दस्त क्र . १०७०/२०२१ द्वारे जमीन खरेदी केली. यावेळी जमीन खरेदीसाठी एकूण ४३ लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यापैकी ४. ५० लाख रुपये डी .डी द्वारे व उर्वरित ३८. ५० लाख रुपये रोख स्वरूपात आरोपीस दिले मात्र , नंतर मूळ अभिलेख तपासणी दरम्यान सादर गटांची कोणतीही बिगरशेती आदेश मंजूर नसल्याचे स्पष्ट झाले.
