नवरत्न पतसंस्थेच्या चेअरमनपदी थोटे, व्हा. चेअरमनपदी माने 

नवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संतोष वसंत थोटे व व्हा. चेअरमनपदी संजय व्यंकटराव माने यांच्या बिनविरोध निवडी झाल्या. या निवडीनंतर संस्थापक सचिन चौगुले यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या निवडीनंतर संस्थापक सचिन चौगुले यांच्या हस्ते सत्कार झाला. तालुका सहकारी निवडणूक अधिकारी संभाजी पाटील प्रमुख उपस्थित होते. सचिव प्रमोद कोरेगाव यांनी स्वागत केले. यावेळी संस्थेचे संचालक संजय श्रीधर डांगे, सुनील बापुसो पाचोरे, शशिकांत सदाशिव रावळ, सुधीर महावीर हालुंडे, अमित अजित मालगावे, नितीन अशोक वाडकर, उदय राजाराम गुरव, संचालिका संगीता शितल कोरेगावे, आरती बाबासो चौगुले, विजय दत्ताराम कांबळे, विजय महावीर कवठेकर, अरविंद शिवाजी खोत, संस्थेचे मॅनेजर प्रमोद दादासो कोरेगावे व सेवक वर्ग उपस्थित होते.