आ. पडळकर यांच्या निषेधार्थ आष्टा बंद

आष्टा, लोकनेते राजारामबापू पाटील व आ. जयंत पाटील यांच्या बद्दल खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी केल्याबद्दल आ. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे आष्टा शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मुख्य रस्त्यावर एकत्रित आले. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निषेध मोटारसायकल निघाली. दिवसभर कडकडीत बंद होता. यावेळी शिवाजीराव चोरमुले, दिलीपराव वग्यानी, संग्राम फडतरे, विशाल शिंदे, विराज शिंदे, झुंजारराव पाटील, रामचंद्र सिद्ध, संग्राम जाधव, अमित ढोले, विजय मोरे, दत्तात्रय मस्के, संदीप तांबेकर, मोहन गायकवाड अनिल शिंदे सयाजी गावडे अनिल सिद्ध नातू मुजावर राजू माने शकील मुजावर, विष्णू मस्के, अर्जुन माने यांच्यासह पदाधिकारी समर्थक उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यालयापासून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, एकविरा मंदिर, बसुगडे चौक, मटण मार्केट परिसर, नगरपालिका चौक, मिरज वेस, कम वेस, गणपती मंदिर, दरोजबुवा चौक, अहिल्या चौक, सोमाजी ढोले कमान, थोट डेअरी, डांगे कॉलेज, दुधगाव रस्ता शिराळकर कॉलनी, बाळासाहेब ठाकरे चौक ते राष्ट्रवादी कार्यालय या मार्गे मोटारसायकल रॅली झाली.