दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार जयंती निमित्त सविधान गौरव जागर व कुस्ती स्पर्धा

हातकणंगले,   भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी इंग्रजांच्या विरोध लढणाऱ्यांच्या मांदीयाळीमध्ये देशभक्त रत्नाप्पाण्णांचे नांव आग्रक्रमाने घेतले जाते. स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी दाखविलेला त्याग पाच वर्ष भूमिगत राहून घेतलेले कष्ट पश्चिम महाराष्ट्रातील छोठ्या मोठ्या गावांतून तेव्हांच्या युवा पीडीला दिलेली प्रेरणा आणि त्यातून घडलेले क्रांती कार्य या सर्वच गोष्टी वंदनीय आहेत अशा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११६ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी देशभक्त रत्नापाण्णा कुंभार यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोरोचीतील धनगर माळापासुन संविधान गौरव जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी साडेनऊ वाजता पंचगंगा काखाना स्मार स्थळी अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर रत्नदिप हायस्कूल येथे वक्तृत्व स्पर्धा होणार असुन दुपारच्या सत्रात विविध वजनी गटातील मॅटवरील कुस्ती (wrestling)स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
यामध्ये पंधरा वर्षाखालील सिनिअर गट ओपन गट ७० ते ८० किलो अशा गटात कुस्ती स्पर्धा होणार असून वरील सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचगंगा कारखान्याच्या माजी अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम या असणार असून कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जयंती उत्सव समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे..