हातकणंगले, कुंभोज – दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पोवेकर यांच्या जनावरांचा गोठा व महेश पांडव यांच्या पोल्ट्रीजवळ रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या आढळून आला. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाल्याने
परिसरातील नागरिकांत घबराहट पसरली आहे.
कुंभोज हद्दीतील शेतामध्ये अमित पोवेकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. हा बिबट्या बाबुजमाल डोंगराच्या दिशेने गेल्याचे दिसून येत आहे. कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांनी महेश पांडव व अमित पोवेकर यांच्या मळ्याजवळ गर्दी केली.
नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या परिसरात आढळून आला नाही.
