सांगोला येथे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवड्याचे नियोजन

सांगोला तालुका प्रतिनिधी शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ सांगोला तालुक्यात आयोजित करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांताधिकारी बी. आर. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

या पंधरवड्यातील उपक्रम तीन टप्प्यांत राबवले जाणार आहेत. पहिल्या टप्यात (१७ते २१ सप्टेंबर) तालुक्यातील शेत रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती व रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याचे काम होणार आहे. दुसऱ्या टण्यात (२२ ते २६ सप्टेंबर) सर्वांसाठी घरे या कार्यक्रमांतर्गत घरकुलासाठी जागा वाटप, खरेदी-विक्री व अतिक्रमण नियमन आदी प्रकरणे हाताळली जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात (२७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करणे, वंचित घटकांना दाखले वाटप, संजय गांधी योजनेचा लाभ, पुरवठा विभागाच्या सेवा, रस्ते अदालत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणमुक्ती तसेच तृतीयपंथी, एकल शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. महिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल .