राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई , केरळ उपांत्य फेरीत

सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या सुसज्ज इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धाच्या दुसऱ्या दिवशीही चुरशीच्या सामन्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. फाल्कन्स मुंबई, सातारा जिमखाना, सातारा, नेक्सस स्पोर्टस् नदिड, श्री केरला वर्मा कॉलेज थ्रिसूर, जय हिंद जिमखाना कडा, बीड, ग्रीन स्टार स्पोर्टस् क्लब सोलापूर, नागपाडा मुंबई, जीकेपी मुंबई हे संघ कार्टर फायनल फेरीसाठी पात्र ठरले.

आजच्या सामन्यांमध्ये एस. एन.जी. नागपूर आणि लाईफ चेंजर मुंबई या यातून एम.एन.जी. नागपूर विजयी, इंटरनॅशनल वाय.एम.सी.ए. मुंबई आणि सातारा जिमखाना, सातारा यातून सातारा जिमखाना विजयी तसेच सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि ग्रीन स्टार स्पोर्टस् क्लब खारघर बादरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये सांगोला संघ विजयी झाले. साखळी सामन्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या संघांचे सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे माजी खेळाडू पोलिस निरीक्षक निगडी, पुणेचे महेश बनसोडे आणि पोलिस उपनिरीक्षक नागरी हक्क संरक्षण सोलापूरचे मचिन वसमळे यांनी अभिनंदन केले. पारितोषिक वितरण समारंभास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, विश्वविजेता भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे आणि संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्यासह उद्योगपती सिद्धार्थ झपके, विलास क्षीरसागर, सुहास होनराव, ज्ञानेश्वर तेली, नागेश तेली, श्रीकांत देशपांडे, मंगेश म्हमाणे, रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन, क्रीडा विभाग कार्यरत आहेत.