सांगोल्यात जमिनीच्या वादातून कोयत्याने मारहाण….

अलीकडच्या काळात अनेक वादावादीच्या घटना या कानी येतच राहतात. कोणत्या ना कोणत्या कारणावरून हा वाद उग्र रूप धरण करतो. अशीच एक घटना सांगोल्यात घडली आहे. वाकी- शिवणे ता. सांगोला येथे जमीन नावावर का करून देत नाही, म्हणत ७५ वर्षीय वडीलास मुलगा, सून व नातवाने शिवीगाळ, मारहाण करत, मुलाने कोयत्याने पाठीत मारून जखमी केले असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दि. १ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर धर्मा राजगुरू रा. वाकी- शिवणे ता. सांगोला यांनी सांगोला पोलीसात मुलगा दादासो ज्ञानेश्वर राजगुरू, सुन सविता दादासो राजगुरू, नातू चैतन्य दादासो
राजगुरू यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.


फिर्यादी यांना दोन मुले विजयकुमार व दादासो हे दोघेही शेती करतात. फिर्यादी यांनी स्वतः कडे काही शेत जमीन ठेवून दोन मुलांना दोघांमध्ये अर्धी- अर्धी जमीन वाटणी करुन नोंद करुन दिलेली आहे. फिर्यादी यांच्या नावावरील जमीन माझ्या नावावर करुन दे असे म्हणून मोठा मुलगा दादासो राजगुरू हा वारंवार विचारणा करत शिवीगाळ, दमदाटी करू लागला. यावेळी दादासो याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता फिर्यादी यांच्या पाठीत मारून जखमी केले आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे.