इचलकरंजीत प्रभाग रचनेवर आज सुनावणी

इचलकरंजी,  महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्रशासनाने हरकतींसाठी ठेवलेल्या अंतिम मुदतीपर्यंत २२ हरकती दाखल झाल्या. त्यावर उद्या गुरुवार ता. २३ रोजी दुपारी एक वाजल्यापासून महानगरपालिकेच्या सभागृहात सुनावणी सुरू होणार आहे. दिवसभरात २२ हरकतीवर सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहेत.न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या स ूचना नुसार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये आगामी सर्व अधिकार हे केवळ निवडणूक आयोगालाच आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेचे अधिकार शासनाला नसल्याचे ते म्हणाले.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत मात्र जिल्हा परिषदेची प्रभाग रचना ही कायद्याच्या चौकटीत राहूनच केली असल्याचा युक्तिवाद राज्य शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला होता. आज बुधवारी पुन्हा झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अॅड. अतुल दामले यांनी अधिसूचनेचा उल्लेख करून प्रभाग रचनेचे अधिकार शासनाला देण्यात आले असल्याचे सांगितले आणि त्यानुसार जिल्हा परिषदेची प्रभाग रचना करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. आयोगाकडून मांडण्यात आलेली बाजू ऐकल्यानंतर आता यावर उद्या गुरुवारी दुपारी चार वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.