मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचे आदेश मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्याने सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमध्ये या योजनेचा शुभारंभ आयोजित करण्यात आला आहे असे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी व सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, पालक अधिकारी म्हणून सर्व विस्तार अधिकारी, विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, पशुवैद्यकीय अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी नेमुन दिलेल्या ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहून ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच ग्रामपंचायत समृद्ध करणे, गावात विकासासाठी स्पर्धा निर्माण करणे, आदर्श गावे निर्माण करणे, काँक्रीट रस्ते, पानंदरस्ते तसेच आपले गाव विकासाचे मॉडेल कसे होईल याबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली आहे.
सर्व ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान कामी सरपंच व प्रशासक यांचे अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली असून त्या मध्ये आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, शासकीय कर्मचारी महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आरोग्य सेवक शिक्षक, कृषी अधिकारी, पोलीस पाटील व सोसायटी चेअरमन इत्यादी ग्रामस्थांची कमिटी नेमण्यात आली आहे यामध्ये एकूण सात स्तंभ प्रमाणे कामे सुलभ करण्यात यावी म्हणून वेगवेगळ्या लहान कमीत्या केल्या आहेत तरी त्यांना वरील अभियान राबविण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे या कामी विस्तार अधिकारी पंचायत अमोल तोडकरी, देवराज पुकळे, विस्तार अधिकारीआरोग्य मिलिंद सावंत, विस्तार अधिकारी कृषी अभिजीत पवार, बाळासाहेब खटकाळे, पवार मॅडम, पुंडलिक गंगदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी अजित देशमुख, परमेश्वर नागणे व महेश जाधव यांनी परीश्रम घेतले आहे. तसेच आज आरोग्य विभागामार्फत “स्वस्थ नारी सशक्त परिवार” या अभियानाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र कोळा व घेरडी येथे केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप देवकते व विस्तार अधिकारी मिलिंद सावंत यांनी सांगितले आहे.
