हातकणंगले, येथील ब्राह्मण समाज संघ (वडगाव) यांच्या तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त २९ वे शारदीय ज्ञानसत्र व्याख्यानमाला आयोजित केली आहे. २२ ते २९ सप्टेंबरपर्यंत दिगंबर जैन मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत व्याख्यानमाला होणार आहे. असे ब्राह्मण समाज संघाचे अध्यक्ष प्रमोद देवस्थळी, उपाध्यक्ष संजय बुवा, कार्यवाह वासुदेव अंबपकर यांनी सांगितले.
सोमवारी प्रा. राजा माळगी यांचे संस्कृतीचे सोनेरी धागे या विषयावर, मंगळवारी विनायक गायकवाड यांचे थोडसं जगणं समाजासाठी या विषयावर, बुधवारी डॉ. आनंद कुलकर्णी यांचे आरोग्याची किल्ली गृहिणीच्या हाती या विषयावर, गुरुवारी प्रमोद माळी यांचे निसर्ग संवाद या विषयावर, शुक्रवारी संजय लिमये यांचे दैनंदिन जीवनामध्ये नीतीमूल्यांची गरज या विषयावर, शनिवारी अश्विनकुमार कुलकर्णी यांचे मैफील सुरांची या विषयावर, रविवारी बाबासाहेब परीट यांचे कथाकथन या विषयावर व सोमवारी दिपक भागवत यांचे तुका झालासे कळस या विषयावर व्याख्यान होईल.
