इचलकरंजी, कर्नाटक गांधी स्मारक निधी, बेंगलुरू यांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय अर्कचित्र संस्था आयोजित आणि इजिप्त अर्कचित्र व्यासपीठ यांच्या सहयोगाने बेंगलुरू येथील सदर संस्थेमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनावरील अर्कचित्रांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सदर आंतरराष्ट्रीय अर्कचित्र प्रदर्शनामध्ये जगभरातील इजिप्त, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ब्राझिल, क्युबा, इंडोनेशिया, रोमानिया, कोलंबिया, सिरिया, इटली मोरोक्को, पोलंड, स्पेन, पेरू, इराण, बोस्निया, दक्षिण आफ्रिका इ. देशातील जगप्रसिध्द अर्कचित्रकार सर डेव्हिड लो, आर. के. लक्ष्मण, शंकर रंग यांच्यासह ३१ ‘देशातील ५५ आणि भारतातील ४५ नामवंतअर्कचित्र कलाकारांची अर्कचित्रे पहायला मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनाकरीता वोव्हनटेक्स इंडिया प्रा. लि. खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेट इचलकरंजी या टेक्सटाईल कंपनीचे विजयकुमार ब. मुसळे यांच्या अर्कचित्राची अभिनंदनीय निवड झालेली आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. श्री. मुसळे यांना अर्कचित्रे रेखाटण्याचा छंद आहे. यापूर्वी त्यांची अनेक अर्कचित्रे अनेक प्रदर्शनात प्रशंसनीय ठरली आहेत. सदरच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ता. ४ ऑक्टोबर २०२५ | रोजी बेंगलुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्टस, १ मिडफोर्ड गार्डन, एम. जी. रोड, येथे होणार आहे. प्रदर्शन ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत सुरू राहील.
