हातकणंगले, येथे गुटखा व सुगंधी तंबाखूची बेकायदेशीररीत्या वाहतूक करणारा टेंपो हातकणंगले पोलीसांनी पकडला. या कारवाईत टेंपोसह गुटखा, सुगंधी तंबाखू, एक मोबाईल असा ३१ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चौघा जणाना अटक केली आहे.
टेंपो चालक यासीन दस्तगीर जमादार (वय २९, रा. संग्राम चौक, इचलकरंजी), अविनाश वडगावे ( रा. रुई), अनिकेत मांगलेकर (रा. इचलकरंजी), टेम्पो मालक प्रमोद पाटील (रा. इचलकरंजी) यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक नानासो पवार, पोहेकॉ मच्छीद्र पटेकर, गणेश खरजे, प्रशांत पोवार, पोका विठठल जाधव (चालक), होमगार्ड मुजावर, वाणेकर, कोळी, सौद आदिंच्या पथकाने मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. पहाटे हातकणंगले पोलीसांची गस्त चालु असताना रुई येथील आण्णाभाऊ साठे नगरमध्ये लेलँड कंपनीचा राखाडी रंगाचा टेंपो ( एम. एच. ५१ सी ०६४७) पोलीसांनी अडवून त्याची तपासणी केली असता यामध्ये प्लास्टिकच्या ९८ पोत्या मध्ये विमल कंपनीच्या गुटख्याचे व सुगंधी तंबाखुचे पुडे निदर्शनास आले.
या प्रकरणी टेंपो चालक यासीन जमादार याच्याकडे चौकशी केली असता त्याने अविनाश वडगावे व अनिकेत मांगलेकर यांच्या मालकीचा गुटखा असून प्रमोद पाटील यांच्या सांगण्यावरून गुटख्याची वाहतूक करत असल्याचे सांगितले.
