फॅबटेक’च्या सभासदांना १५ टक्के लाभांश

फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ३० शाखांच्या माध्यमातून ४१२ कोटी रुपयांची उलाढाल पूर्ण केली आहे. येत्या डिसेंबर अखेरीस पतसंस्था १०० कोटी रूपयांचा सोने तारण कर्ज वाटपाचा टप्पा पूर्ण करेल असा विश्वास चेअरमन भाऊसाहेव रूपनर यांनी व्यक्त केला.

फॅबटेक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सांगोला यांच्या ९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी करण्यात आले. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन चेअरमन भाऊसाहेब रूपनर, संचालक राजाभाऊ रूपनर, सुरेखा रूपनर, दिपक रूपनर, दिनेश रूपनर, डॉ. संजय आदाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या आर्थिक वर्षात सभासदांना १५ टक्के लाभांश तसेच सवं कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या पगाराएवढा बोनस चेअरमन रूपनर जाहीर केला.

या सभेचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब भोसले यांनी केले. यावेळी मुख्य वित्त अधिकारी विजय तंडे यांनी गेल्या आर्थिक वर्षातील नफा तोट्याचा तपशील, वार्षिक आर्थिक अहवाल, नवीन योजनांची माहिती, ठेवी व कर्ज वाटप याविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सभेचे सूत्रसंचालन दत्तात्रय गायकवाड यांनी केले तर आभार मोनाली लोखंडे यांनी मानले.