लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी मिळणार कर्ज, हप्ते असे वळते होणार

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्ज (oans)उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना निकषांना आणि ई-केवायसीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होत असताना राज्यातही लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आता 1 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. महिलांना 0 टक्के व्याजदराने हा कर्ज (oans)पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. या योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे. त्यांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी आहे.

2100 रुपयांचा हप्ता ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनामध्ये महिलांना प्रती माह 1500 रुपये अनुदान दिले जाते. लवकरच हे अनुदान 2100 रुपये करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण त्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या मिळणाऱ्या अनुदानातून कर्जाचे हफ्ते वसूल केले जाणार आहेत.