९० टक्क्यांपर्यंत दंड व व्याज माफ होणार
इचलकरंजी, शहरातील मिळकत धारकांसाठी महापालिकेने दंड व व्याजमाफीची अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत एकरकमी रक्कम भरल्यास ९० टक्के दंड व व्याज माफ होणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
शहरातील मिळकत धारकांसाठी मालमत्ता कर विभागाच्यावतीने अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मालमत्ता करावरील शास्ती म्हणजेच दंड व व्याज एकरकमी भरल्यास सवलत मिळणार आहे. मात्र, अनधिकृत बांधकामांवरील शास्ती वगळून ही सवलत देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एका महिन्याच्या कालावधीत रक्कम भरल्यास दंड व व्याज सवलत मिळणार आहे. १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत ९० टक्के सवलत, १६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ७५ टक्के सवलत, ४ ते १८ नोव्हेंबरपर्यंत ५० टक्के सवलत, तर १९ ते २७ नोव्हेंबरपर्यंत २५ टक्के दंड व व्याजामध्ये सवलत देण्यात आली आहे.
कार्यालय तसेच प्रभाग समिती विभाग कार्यालयातील कर संकलन केंद्रामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५ महापालिकेच्या मुख्य या वेळेत मालमत्ताधारकांना व ऑनलाईन भरणा करता येईल. एकवेळ मिळणाऱ्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आयुक्त पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
