आ . बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी १ महिन्याचे वेतन

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे विशेषतः मराठवाडा व विदर्भासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ महिन्याचे वेतन दिले आहे. हे पैसे अतिवृष्टी व पूरग्रस्तांना पुनर्वसन व मदतीसाठी वापरले जातील , असे आ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले .

मुख्यमंत्री सहायता निधी हा राज्यातील विविध आपत्ती व सामाजिक मदतीसाठी वापरला जाणारा महत्वाचा निधी आहे. गेल्या काही वर्षांत या निधीतून कोविड , पूर व दुष्काळग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली आहे. आ. देशमुख यांच्या या निर्णयाने स्थानिक शेतकरी व नागरिकांनी स्वागत केले असून हे योगदान सांगोला मदतरसंघातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल असे मत व्यक्त केले आहे. या मदतीमुळे सांगोला तालुक्यातील पूरग्रस्तांना दिलासा मिळेल . शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी विविध कागदपत्रांची यादी जाहीर केली असून, शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करावेत , असे आवाहन आ. डॉ . बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.