जुगारावर अड्डयावर धाड; सुमारे १६ हजारांची रोकड जप्त 

घेरडी येथील पारे रोड वरील वेताळवाडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सुमारे १६ हजार ८०० रूपयांची रोकड जप्त केली. दस्तगीर पाशा जहागीरदार (रा. तेनीहळ्ळी ता. इंडी जि. विजयपुरा सध्या रा. गोल्डन चौक, घेरडी ता. सांगोला), पंकज रामदास घाडगे (रा. कडबे गल्ली, पंढरपूर ), दत्तात्रय दशरथ थोरबोले (रा. शिरनांदगी ता. मंगळवेढा), राजू सुतार (रा. सिरनांदगी ता. मंगळवेढा) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पो.कॉ. अमर पाटील यांनी फिर्याद दिली. सांगोला पोलिसांना, घेरडी गावातील, घेरडी ते पारे रोड वरील, वेताळवाडी शाळेच्या पाठीमागे पत्रा शेड समोर झाडाखाली काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कारवाई करत सुमारे १६ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली.