विटा, उदगिरी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या १३ व्या गळीत हंगामात दररोज ५ हजार ५०० मेट्रिक टन ऊस गाळप करेल,अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राहुल यांनी दिली. खानापूर तालुक्यातील बामणी येथील उदगिरी साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निदीपन माजी आमदार व सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वनश्री मोहनराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सत्यनारायण पूजा कारखान्याचे सर व्यवस्थापक कुलदीप पांढरे व साक्षी पांढरे यांच्याहस्ते करण्यात आली. जे. के.(बापू ) जाधव , आबासाहेब चव्हाण,दिलीपराव पाटील, ए. डी. माने, आर. एम. पाटीलसर, अभिजित शिंदे, भरत लेंगरे, महावीर शिंदे उपस्थित होते. आभार संचालक प्रल्हाद पाटील यांनी मानले.
‘ उदगिरी’ च्या साडेपाच हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ; डॉ. कदम
