आष्ट्यात कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जन! नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

आष्टा नगर परिषद व झंवर उद्योग समूहातर्फे कृत्रिम तलाव तयार करून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आष्टा शहरात श्रीराम मंदिरानजीक रामप्रताप झंवर डायग्नोस्टिक सेंटरसमोर
दोन काहिलीमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून कृत्रिम तलाव तयार केला होता.

यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, उद्योजक नितीन झंवर, डॉ. सतीश बापट, मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, शरद पाटील, प्राध्यापक सूर्यकांत जुगदर, सुनील माने, दीपक पाटील, मच्छिंद्र कांबळे उपस्थित होते. या उपक्रमाचे संयोजन अमोल देशिंगे, सुधीर पाटील, रणजित तांबवेकर, इसामुद्दीन मुल्ला, दिनेश जाधव, विश्वजित महाजन यांच्यासह कर्मचारी व नागरिकांनी केले.