आष्ट्यात नगराध्यक्ष पदासाठी खुले आरक्षण

आष्टा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या 5 आरक्षणाने आज दिवसभर शहरवासीयांना खिळवून सोडले. कही खुशी कही गमच्या दिवसभराच्या चिंतनात पाच वाजता अचानक मोठा चिंता, काहूर, बदल झाला. नगराध्यक्ष पदासाठी दुपारपासून तिरंगी लढत अनुसूचित जाती पुरुष (एससी) प्रवर्गासाठी आरक्षणाची चर्चा होती, होण्याची चिन्हे तशा पोस्ट सोशल मीडियात झळकत होत्या मात्र पाच वाजता खुल्या गटासाठी नगराध्यक्ष पद घोषित झाल्याने एकच जल्लोष झाला. दिवसभर मरगळलेले राजकीय वातावरण ऊर्जेने भरले. आता भाजपा राष्ट्रवादी अजित पवार व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. पालिकेची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित झाले आहे. 

राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत सोमवारी मंत्रालयात जाहीर झाली. दुपारपासून आष्टा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याच्या बातम्या शहरात धडकल्या होत्या. त्यामुळे खुल्या गटातील इच्छुकां नाराजीचे वातावरण होते. मात्र पालिकेतून याबाबतची अधिकृत माहिती मिळत नव्हती. सायंकाळी पाच वाजता आष्टा नगरपालिकेसाठी खुल्या गटाचे आरक्षण जाहीर झाल्याची घोषणा होताच शहरात पुन्हा जल्लोष सुरू झाला. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने इच्छुकांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सत्ताधारी विलासराव शिंदे व जयंत पाटील गटाकडून विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, दिलीपराव वग्यांनी यांच्या नावाची चर्चा आहे. तर विरोधी भाजपाकडून अमोल पडळकर, लता पडळकर, अजित पवार गटाकडून प्रवीण माने, शिवसेनेकडून दिलीप कुरणे, वीर कुदळे यांच्या नावांची चर्चा आहे.