मूक अभिनयाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयाच्या सहभागी २७ संघापैकी आयोजकांच्या नियमावलीत बसलेल्या २० संघाच्या मुला मुलींनी उत्तम सादरीकरण केले. मुलाभिनयातून साकार सादरीकरणाच्या विषय प्रेक्षकांच्या लक्षात येताच टाळ्यांचा कडकडाट होत असलेला दिसून आला.
मूकाभिनय ही कला अतिशय गांभीर्याने व विषय प्रेक्षकांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने संगीताच्या साथीने सादर केली जाते. यामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवांच्या हालचाली , चेहऱ्यावरचे हावभाव व प्रसंगानुरूप केलेले सादरीकरण या बाबी महत्वाच्या असतात. युवा युवती कलाकारांनी मूक अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान भेट व महाराजांनी अफजलाचा केलेला वध तसेच स्त्रियांवरील अत्याचार , स्त्री शक्तीचा जागर, शेतकरी आत्महत्या अशा विषयांचे अभिनयातून कलेचा आविष्कार दाखवित सादरीकरण केले. २७ संघाची नोंदणी असताना ७ संघानी वेळेत उपस्थिती न दाखवल्याने त्यांनी स्पर्धेततून बाद ठरविण्यात आले. मात्र , २० संघानी केलेल्या सादरीकरणाचे प्रेक्षकांनी तोंड भरून कौतुक करीत कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या रंगमंचावर सदर होणाऱ्या मूक अभिनयाचे लोककला मंच प्रमुख प्रा. सदाशिव शिंदे , सदस्य डॉ. दीपक कवडे , प्रा. कृष्ण पवार , प्रा. शिवरत्न होनराव , प्रा . अमोल कावळे , प्रा. संतोष लवटे , प्रा. उदयसिंह पाटील , प्रा. घाडगे , प्रा. मुलाणी व शंकर माने यांनी योग्य नियोजन करून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या .
