माणगंगा नदीत दुचाकीसह वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू

आटपाडी, ते सांगोला मार्गावर पिंपरी खुर्द येथे माणगंगा नदीच्या पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेल्या आकाश जरे (वय २५ ,रा. खवासपूर ,ता. सांगोला ) या तरुणाचा मृतदेह अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर बोंबेवाडी बंधाऱ्यात सापडला. सोमवारी दुपारी ही घटना घडली होती. माणगंगा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली आहेत. सोमवारी दुपारी आकाश जरे मित्रासह दुचाकीवरून आटपाडीकडून पिंपरी खुर्दकडे जात होता. येथील माणगंगा पुलावरून पाणी वाहत होते. येथील माणगंगा पुलावरून पाणी वाहत होते. तरीही दोघांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकीवरील तोल सुटला. मागे बसलेला मित्र कसाबसा पाण्यातून बाहेर आला,परंतु आकाश नदीत वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शीतल बंडगर , सहायक निरीक्षक बीशेंद्रसिंह बायस घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर मंगळवारी दुपारी बोंबेवाडी येथील बंधाऱ्यातील पाणी सोडल्यावर आकाशचा मृतदेह सापडला. घटनेची नोंद आटपाडी पोलिसात आहे.