आष्ट्यात प्रभागनिहाय आरक्षण सोडत प्रस्थापित सेफ; नवख्यांचा प्रवास खडतर

 
आष्टा पालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२ प्रभागातील २४ नगरसेवक पदांची आरक्षण सोडत नगरपालिकेत सोडतीने जाहीर झाली. प्रस्थापित इच्छुकांना अपेक्षित सोडती झाल्याने गम कम ख़ुशी जादा असे वातावरण होते. आष्टा पालिकेच्या सभागृहातं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या हस्ते आरक्षणाच्या चिट्ट्या काढण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी अजितदादा गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट यांच्यासह काही पक्षांच्या इच्छुकांनी आरक्षण सोडत पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

प्रभागनिहाय आरक्षण असे- प्रभाग क्र. १ – अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४- अनुसूचित जाती व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र.६- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. ७- नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ८ – नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र.९- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. १० – नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ११ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्र. १२ – अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला. दरम्यान, या आरक्षणामुळे जयंत पाटील गटाचे अनेक वर्षांपासून इच्छुक असणारे जि.म. बँकेचे दिलीपराव वग्याणी, विराज शिंदे, संग्राम जाधव, संग्राम फडतरे यांची स्वप्ने साकार होण्याची शक्यता आहे. अनेकांना अपक्ष लढावे लागेल तशी तयारी काहींनी सोडतीनंतर लागलीच सुरु केली आहे.