अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार

इचलकरंजी आगामी होऊ घातलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी शिवसेना इचलकरंजी शहर कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिला. शिवसेना इचलकरंजी शहर कार्यालय येथे आगामी महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात पदाधिकारी व निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली होती, या बैठकीमध्ये वैभव उगळे बोलत होते. ते पुढे म्हणाले,  इचलकरंजीच्या १६ प्रभागांमध्ये शिवसेनेची ताकद असून ज्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल व महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यामध्ये शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा आघाडी मधून मिळाव्यात या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी जोर धरावा असे आवाहन केले. 

या बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शिवसेना इचल शहरप्रमुख सयाजीराव चव्हाण, उपतालुकाप्रमुख दिनकर अनुसे मलकारी लवटे, धनाजी मोरे शिवाजी पाटील, सौ मंगल चव्हाण, मंगल मुसळे, उपशहर प्रमुख मनोज भाट, गणेश जंगटे, राजू मोकाशी, संतोष गौंड, महिला आघाडीच्या सौ शोभा गोरे, सौ लक्ष्मी बुरले, आदि पदाधिकारी उपस्थित होते.