सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीने भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कोळा गाव संपूर्ण बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात केला तसेच स्वर्गीय आबासाहेब यांच्या प्रतिमेस दूध अभिषेक तसेच हार अर्पण करून सोहळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी सर्व नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास कोळा गावचे जेष्ठ नेते तुकाराम दादा आलदर , माजी सरपंच सीताराम सरगर , रफिक भाई तांबोळी , सूतगिरणीचे संचालक कुंडलिक आलदर सर डॉ . सादिक पटेल , प्रा मारुती सरगर सर दिलीप देशमुख , पत्रकार जगदीश कुलकर्णी , ॲड दयाप्पा आलदर हरी आलदर , शिवाजी कोळेकर , सोपान कोळेकर , दिलीप कोळेकर चेअरमन सुभाष कोळेकर अशोक आलदर , दगडू कोळेकर बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष समाधान आलदर , बाळासाहेब कोळेकर , उद्योगपती सुरेश आलदर , आबा आलदर , झाकीर पाटील अजित देशमुख, समाजसेविका वंदनाताई सरगर , नामदेव आलदर, सुखदेव कोळेकर , विजय माळी , प्रल्हाद मेटकरी , वामन पाटील, ईश्वर घाडगे , विजय आलदर ॲड निलेश मदने , असलम पटेल दादा कोळेकर शंकर गोरड अनिकेत पोरे यांच्यासह आदी उपस्थित होते. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळा बीटचे एपीआय चंद्रकांत पुजारी हवालदार प्रकाश कोष्टी , सचिन वाघ , सुरेश माळी केदारनाथ परमशेट्टी पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रस्ताविक कुंडलिक आलदर सर आभार मारुती सरगर यांनी मानले.
