आटपाडी,लायन्स क्लब ऑफ आटपाडी, युनायटेड व संजीवनी हॉस्पिटल दिघंची यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन दिघंची येथे करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले,’ हृदय हा शरीराचा मुख्य घटक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. आयुष्यात प्रत्येकाला सुखी – आनंदी राहायचे असेल तर दुसऱ्यांच्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि गरजेनुसार तपासणी केली पाहिजे . या कार्यक्रमास सिनर्जी हॉस्पिटलचे सांगलीचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ् डॉ. प्रदीप देवकाते उपस्थित होते. हृदयरोगाचे प्रकार, त्यावरील उपचार पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला माजी सरपंच अमोल मोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर मिसाळ , सामाजिक कार्यकर्ते सोपान काळे तसेच दिघंची येथील डॉ. अमोल मोरे, डॉ. असिफ तांबोळी,डॉ. दिगंबर मोरे, डॉ. उन्मेश देशमुख यांच्यासह परिसरातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,रुग्ण व नागरिक उपस्थित होते.
यावेळी १३५ रुग्णांच्या हृदयाच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. शिबिरात रुग्णांची मोफत ईसीजी काढून रक्तातील साखर तपासण्यात आली. लायन्स क्लबचे चार्टड अध्यक्ष तानाजीराव निकम,उपाध्यक्ष डॉ. विनायक पवार, सचिव उदयसिंह पाटील, खजिनदार डॉ. जीवन पाटील,नारायण कदम,डॉ. उमाकांत कदम, शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण, वैभव चोथे, काकासो सावंत, डॉ. शरद हसबे,डॉ. विक्रांत पाटील,डॉ. गजानन मोरे, पवनकुमार पाटील, मुक्तेश्वर माडगुळकर , जीएसटी इन्स्पेक्टर विनित पाटील,सुरेश जाधव, राजेश चव्हाण शेठ, प्रसाद जवळे, अतुल जाधव शेठ, सागर डोंगरे , धैर्यशील गाढवे,उदय भिंगे,अरुण डोंबे,पोपट बाड, राजकुमार शिरकांडे, लक्ष्मण शिरकांडे,शिवाजीराव पाटील तसेच मार्केट कमिटीचे संचालक ॲड. माणिकराव गाढवे उपस्थित होते. आभार डॉ. संतोष मिसाळ यांनी मानले.
