आटपाडी , आटपाडी शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली. आटपाडी येथील ओमशांती कॉलनीमध्ये अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोल्त होते. पाटील म्हणाले, शहरात शिवसेना आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याने विकास कामांना गती मिळाली आहे. येथील नागरिकांची अंतर्गत रस्त्यांची अनेक दिवसापासून मागणी होती. त्याची पूर्तता करता आल्याचे समाधान वाटते. यावेळी दत्तात्रय पाटील,शहाजी जाधव, दिनकर पाटील,साहेबराव पाटील, अरविंद चव्हाण , डॉ. विनय पत्की, हणमंत पाटील,अमरसिंह पाटील, रावसाहेब सागर , रवी सातारकर, उत्तम बालटे, बाळासाहेब हजारे, नितीन कुलकर्णी, मनोज देशपांडे, गोरख सागर, सुहास डोईफोडे , जगन्नाथ लोखंडे आदी उपस्थित होते.
आटपाडीत विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही; तानाजीराव पाटील
