महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. दर महिन्याला योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना सरकारकडून 1500 रुपये दिले जातात. मात्र दिवाळी उलटून गेली तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस शिल्लक असताना अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा अनेक बहिणींना लागून राहिली आहे. अशातच आता यासंदर्भातील मोठी माहिती समोर आलीये.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. विभागाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी लवकरच संबंधित विभागाकडून याबाबतची अधिकृत सूचना जारी करण्यात येणार अशी माहिती मिळालेली आहे.
महाराष्ट्रात महानगरपालिका, नगरपरिषद, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि यादरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणं शक्य नसतं. तेव्हा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता हा पुढील आठ दिवसात मिळण्याची शक्यता आहे.
