इचलकरंजी, इचलकरंजी शहर, ज्याला औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. त्याच शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र, एखाद्या दुर्लक्षित गावापेक्षा वाईट झाली आहे. पावसाच्या काही सरींनीच शहरातील रस्त्यांची खरी परिस्थिती उघडी पाडली आहे. कुठे डांबराचे थर उखडलेले, कुठे खोल खड्डे पाण्याने भरलेले,आणि कुठे चिखलामुळे वाहतूक खोळंबलेली .
आता वेळ आली आहे पॅचवर्क नव्हे, तर पॅशनवर्क करण्याची. जबाबदारी, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हेच इचलकरंजीच्या रस्त्यांना नवा जीव देऊ शकतात. अन्यथा, नागरिकांचा विश्वास आणि शहराचा सन्मान दोन्ही कायमचे या खड्यांमध्येच गाडले जातील. असे बोलले जात आहे.
महानगरपालिका प्रशासन, मक्तेदार, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) या तिन्हींच्या निष्काळजीपणामुळे शहरातील रस्त्यांची ही दुर्दशा झाली आहे. एका विभागाने खोदकाम सुरू केले की दुसरा विभाग त्याच ठिकाणी खोदतो, आणि अखेरीस दुरुस्ती कोण करणार याची जबाबदारी मात्र, सर्वजण एकमेकांवर ढकलतात. परिणामी शहरातील रस्त्यांचा चुराडा आणि नागरिकांचा त्रास सहन करावा लागतो.
पाणीपुरवठा, फायबर केबल, वीज, ड्रेनेज, गॅस पाईपलाईन अशी अनेक कामे शहरात सुरू आहेत. पण काम झाल्यावर रस्ते पूर्ववत करण्याचे काम पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका अधिकारक्षेत्रात येत असूनही, कुणीच पुढाकार घेत नाही. काही दिवसांपूर्वी काही रस्त्यांवर डांबर टाकून तर मुरुम खडी पॅचवर्क करण्यात आले, पण त्याचा दर्जा एवढा निकृष्ट होता की पहिल्याच पावसात ते siबर वाहून गेले. जणू पॅचवर्क नव्हे तर पैशांचे वर्क झाले असे नागरिकांतून बोलले जात आहे.
पावसाने ही परिस्थिती आणखी बिकट केली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे ते दिसेनासे होतात, वाहने घसरतात. चिखल साचल्यामुळे दुचाकीस्वारांचा प्रवास जीवघेणा झाला आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि महिला प्रवासी यांना
नागरिक आता एकच मागणी करत आहेत जबाबदारी ठरवा आणि टिकाऊ, दर्जेदार रस्ते बनवा. केवळ पॅचवर्कच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांचा अपव्यय थांबवावा. पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिका या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन ठोस कृती आराखडा तयार करावा. प्रत्येक कामाची गुणवत्ता तपासावी आणि दोषींवर आर्थिक दंड ठोठावला पाहिजे.
चालताना पायघसरून पडण्याचे प्रसंग रोजच घडतात. प्रशासनाकडे तक्रारी दाखल होतात, परंतु प्रत्यक्ष कृती मात्र नाही. मक्तेदारांची जबाबदारी ठरवली जात नाही, आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) सुद्धा या परिस्थितीकडे डोळेझाक करीत आहे. शहरातील प्रमुख रस्ते विविध भागात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य आहे.
