Imagesभारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत, आता गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास प्रभावीपणे करण्यासाठी फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं आवश्यक ठरवलं आहे.जर तुम्हाला क्राइम थिलर चित्रपट आणि ओटीटी सीरिज आवडत असतील, तर त्यात तुम्ही एक गोष्टी नक्कीच पाहिलेली असेल.
ती म्हणजे, जेव्हा कोणताही गुन्हा घडतो, तेव्हा त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांइतकाच महत्त्वाचा ठरतो तो ‘फॉरेन्सिक एक्स्पर्ट’!
गुन्हा घडलेल्या ठिकाणी राहिलेला गुन्हेगाराचा एखादा केस, हाताचे ठसे, मृतदेहाच्या नखांमध्ये आढळलेले कण किंवा मोबाईलमधील एखादा मेसेज कशाप्रकारे अतिशय महत्त्वाचा दुवा ठरतो आणि त्याद्वारे सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा तयार होतो, असं उत्कंठावर्धक चित्रण आपण चित्रपटांमध्ये नक्की पाहिलंय.
जे लोक हे दुवे, पुरावे गोळा करून त्यांचं विश्लेषण करतात, आकलन करतात ते ‘फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स’ हे फॉरेन्सिक सायन्सशी (न्यायवैद्यकशास्त्र) संबंधित लोक असतात. तर्क, तंत्रज्ञान आणि विज्ञान हे या क्षेत्रातील तीन महत्त्वाचे घटक आहेत.
या लेखातून या क्षेत्रातील करियर आणि नोकरीच्या संधींबद्दल जाणून घेऊया.
कोणत्या लोकांसाठी हे करियर योग्य ठरू शकतं आणि या क्षेत्रात जाण्यासाठी कोणत्या पात्रतेची आवश्यकता असते? या मुद्दयांबद्दल जाणून घेऊया.
फॉरेन्सिक सायन्समधील करियरच्या संधी
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत, आता गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास प्रभावीपणे करण्यासाठी फॉरेन्सिक पुरावे गोळा करणं आवश्यक ठरवलं आहे.
जसजसं गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे, तसतसं फॉरेन्सिक तज्ज्ञांची आवश्यकतादेखील वाढते आहे.
फॉरेन्सिक सायन्टिस्ट किंवा तज्ज्ञ म्हणजे एखादा गुन्हा घडल्याच्या ठिकाणी सापडलेल्या पुराव्यांचं विश्लेषण वैज्ञानिक पद्धतीनं करणारे तज्ज्ञ होय.
या पुराव्यांचं किंवा दुव्यांचं विश्लेषण करून हे तज्ज्ञ जो अहवाल सादर करतात, त्याच्या आधारे पोलीस, वकील, तपास यंत्रणा किंवा न्यायाधीशांना त्या प्रकरणात नेमकं काय घडलं असेल, हे समजण्यास मदत होते.
फॉरेन्सिक तज्ज्ञ कुठे काम करू शकतात:
केंद्रीय आणि राज्य पातळीवरील फॉरेन्सिक लॅब (सीएफएसएल/एफएसएल)
क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट (सीआयडी)
इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय)
पोलीस खातं
खासगी डिटेक्टिव्ह एजन्सी
सायबर क्राइम सेल
कोर्ट लॅबोरेटरी
संशोधन संस्था
Getty Imagesजाणकारांच्या मते, फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेण्यासाठी देशात अनेक मोठ्या संस्था आहेत.
जाणकारांच्या मते, फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण घेण्यासाठी देशात अनेक मोठ्या संस्था आहेत.
त्यात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (एनएफएसयू), इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स (मुंबई), बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) आणि हैदराबादचं उस्मानिया विद्यापीठ यांचा यात समावेश आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये एनएफएसयूचे कॅम्पस आहेत. या अभ्यासक्रमांसाठी एक वेगळी प्रवेश परीक्षा असते.
याव्यतिरिक्त खासगी विद्यापीठांमध्येदेखील याच्याशी निगडीत अभ्यासक्रम शिकवले जातात आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा असते.
फॉरेन्सिक सायन्समध्ये कशाचा समावेश असतो?
फॉरेन्सिक सायन्समध्ये देखील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्ससारख्या वेगवेगळ्या शाखा असतात.
या सर्व शाखांचा वापर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी किंवा न्यायालयात सादर करता येतील अशा पुराव्यांची तपासणी करण्यासाठी केला जातो.
तसं पाहता फॉरेन्सिक सायन्सची व्याप्ती बरीच मोठी असते
