कुंडल येथील सिटी सर्व्हे २३७९ मध्ये असलेली नागोबा मूर्ती ग्रामपंचायतीने हलवून रस्त्याकडे गटरलगत ठेवून नाभिक समाजाच्या भावना दुखविण्याचे काम केले आहे. तसेच सिटी सर्व्हे ७८६ मध्ये अरुण अण्णा लाड यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत नाभिक समाजाकरिता सभागृह मंजूर केले. परंतू सदर जागेशेजारील सिटी सर्व्हे ७८५ धनगर समाजाचे आराध्य दैवत बिरोबा देवाची जागा आहे.
नाभिक समाजाचे मंजूर झालेले सभागृह बांधकाम करण्याकरिता दोन्ही जागा मोजणे आवश्यक आहे. परंतू ग्रामपंचायत प्रशासन जागेची मोजणी करत नसल्याने दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आज दि १/०९/२०२३ रोजी नाभिक समाजाने सलन दुकान बंद ठेवून प्रशासनाचा निषेध म्हणून कुंडल गावातून फेरी काढून ग्रामपंचायत प्रशासक खाडे, पलूसचे तहसिलदार निवास ढाणे तसेच पलूसच्या गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांना समाजाच्यावतीने निवेदन दिले.
या निवेदनात म्टटले आहे की, लवकरात लवकर नागोबा देवस्थान जागेवरील अतिक्रमण काढून जागा मोजणी करून सदर जागेवरती पूर्वीप्रमाणे नागोवा देव विधिवत बसवावे अन्यथा येणाऱ्या काळात महाराष्ट्र नाभिक महामंडळ सांगली जिल्हाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने बंद ठेवून जाहीर निषेध केला जाईल व कुंडल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समाजाच्यावतीने बहिष्कार टाकण्यात येईल.
यावेळी कुंडल नाभिक शहरचे संतोष साळुंखे, पलूस तालुका अध्यक्ष प्रमोद झेंडे, गणेश गायकवाड, संजय गायकवाड, मनोज गायकवाड, सुरेश गायकवाड, सुनिल गायकवाड, राहुल गायकवाड, शंकर गायकवाड, मारूती गायकवाड, मनोज झेंडे, चंद्रकांत यादव, सचिन गायकवाड, दिलीप सपकाळ, नागेश गायकवाड, मोहन गवळी व नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.