कर्नाटक सरकारने फलकांवर ६० टक्के कन्नड भाषेचा वापर अनिवार्य केल्याचा आदेश काढला आहे.
बेळगावात कन्नड फलकांची सक्ती केली जात आहे. त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटू लागले असून, शुक्रवारी शिवसैनिकांनी कोल्हापूर सीमेवरील कन्नड बोर्ड काढून टाकत कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमाभागात दुकाने, आस्थापनांना कन्नड भाषेतील नामफलक अनिवार्य केले आहेत. मात्र, सरकारने कारवाई करण्याआधीच काही कन्नड संघटनांनी कन्नड वगळता मराठी, इंग्लिश आणि हिंदी भाषेतील बोर्डची नासधूस करून दुकानमालकांवर दादागिरी करत धुडगूस घातल्याच्या घटना बेळगावात वारंवार घडत आहेत.