इचलकरंजीत काही ना काही कार्यक्रमांचे आयोजन शिबिरांचे आयोजन हे होतच असते. बुधवारी 17 जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत श्री बाबुलाल जनार्दन अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी, श्री अग्रसेन सेवा ट्रस्ट इचलकरंजी यांच्यातर्फे कोल्हापूर येथील प्रिस्टीन हॉस्पिटल डॉ. सचिन कुलकर्णी यांच्या सहकार्याने स्त्रीरोग आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केलेले आहे.
या शिबिरामध्ये स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित व रक्तस्त्राव, पाळीच्या वेळेस पोटात दुखणे अशा अनेक तक्रारी असल्यास या शिबिरांमध्ये त्याची तपासणी करून औषधोपचार मोफत केला जाणार आहे तसेच जर गरज पडली तर सोनोग्राफी केली विमोग्राफी ऑपरेशन मोफत केले जाईल त्यामुळे नाव नोंदणी अवश्य करावी असे आवाहन आयोजन संस्थामार्फत करण्यात आलेली आहे.