वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी, तांदूळवाडी, मालेवाडी व लाडेगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संपर्क दौरा संपन्न झाला. शिराळा विधानसभा मतदारसंघाला विकासाचा चेहरा देणाऱ्या मानसिंगभाऊंना पुन्हा विधानसभेवर पाठवून आपले नेते प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांचे हात बळकट करण्याचे प्रतिपादन प्रतीक पाटील यांनी केले.
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष पाटील म्हणाले, आमदार मानसिंगभाऊंनी मतदारसंघामध्ये विकास कामांचा अक्षरशः डोंगर रचला आहे प्रत्येक गावात विकास निधी मिळाल्यामुळे त्यातून महत्त्वाची कामे झालेली आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यासाठी विधानसभेवर निवडून द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत मतदारांपर्यंत पोहोचून मानसिंगभाऊ यांनी केलेली विकासकामे सांगावीत.त्यांना पुन्हा आमदार बनविण्यासाठी मतदारांना आवाहन करावे.
पुन्हा मानसिंगभाऊंना विधानसभेत पाठवून विकासाची मालिका कायम सुरू ठेवावी असे जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी आवाहन केले.