विट्यात उद्या सदाभाऊ अनिल भाऊ आणि अशोक भाऊ येणार एकत्र…

मुंबई येथील आंदोलनासाठी खानापूर तालुक्यातील मराठा बांधवांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केलेले आहे. विट्यातील जय मल्टीपर्पज हॉल येथे उद्या बुधवारी सायंकाळी चार वाजता ही बैठक संपन्न होणार आहे.

या बैठकीसाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे शंकर नाना मोहिते यांनी आवाहन केलेले आहे. या बैठकीस आमदार अनिल भाऊ बाबर, ॲड.सदाशिव भाऊ, अशोकभाऊ गायकवाड एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.