विट्यात पाटील गटाकडून ताकद लावण्यास सुरुवात….

लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्ष हा आपली मोर्चेबांधणी करताना दिसत आहे. तसेच अनेक कार्यक्रम राबवून आपले मत हे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष आपणाला करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकू समारंभ राबवून पाटील गट सज्ज झालाय. ॲड. सदाशिव भाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला वर्गाचा उत्कृष्ट हळदीकुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, प्रणितीताई पाटील यांच्यासह शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या.

हळदी कुंकूचा कार्यक्रम तसेच अनेक विविध कार्यक्रम राबवून नारीशक्ती ऍक्टिव्ह झालेली आहे. या कार्यक्रमादरम्यान तृतीय पंथीयांचादेखील राखीव महिला वर्गाकडून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात हळदीकुंकू बरोबरच संगीत खुर्ची यांसारखे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले.

एकूणच हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून कस्तुरी महिला फाउंडेशनच्या वतीने पाटील गटाच्या महिला मंडळांनी परिसरातील महिलांच्या गाठीभेटी घेऊन यंत्रणा सज्ज करण्याचे पाहायला मिळाले.