संभाजीराजेंच्या खासदारकीचा मार्ग खडतर…..

सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्ष चढाओढ करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत संभ्रमावस्था आहे. लोकसभेसाठी एक म्हणजे कोल्हापूर की नाशिक अगोदर हे संभाजीराजे यांना निश्चित करावे लागेल.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे ते स्वराज्यसाठी जागा सोडा, असा आग्रह धरत आहेत. परंतु स्वराज्यचा विस्तार कोल्हापुरात नाही. महाविकास आघाडीची भूमिका राजू शेट्टी यांच्याबद्दल आहे ती भूमिका संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबतीत आहे असे नाही. पण कोल्हापुरातून तीन पक्षांचे बळ घेऊन संभाजीराजे छत्रपती हे विजयाच्या जवळ पोहोचू शकतात.