कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा चित्ररथ मुंबईकडे रवाना!

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. कोल्हापूरच्या झोंबणार यांना आता मिरच्या… सत्ताधाऱ्यांनो सांभाळा आता तुम्ही खुर्च्या … अशा दिलीप सावंत यांच्या खणखणीत शाहिरीसोबत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा चित्ररथ मुंबईकडे रवाना झाला.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी केला आहे. हा निर्धार करूनच कोल्हापुरातून हजारो मराठा बांधव त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने रवाना झाले. उभा मारुती चौकातून वाजतगाजत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या रथयात्रेची सुरुवात झाली.