हातकणंगलेतच क्रीडा संकुल होणार ; आ. राजू आवळे

मंत्री जयवंतराव आवळे यांनी हातकणंगले येथे क्रीडा संकुल मंजूर केले होते. त्यानंतर अनेकदा संकुलाची जागा बदलण्यात आली. त्यामुळे हा विषय गेल्या २० वर्षांपासून प्रलंबितच आहे. हातकणंगले येथील तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत आ. राजू आवळे यांनी क्रीडा संकुल हातकणंगलेमध्येच होणार, अशी माहिती दिली. या क्रीडा संकुलाचा प्रारंभ लवकरच केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला क्रीडा संकुलाच्या विषयाला त्यामुळे पूर्णविराम मिळाला.

मात्र, आता आपण आमदार असल्याने क्रीडा संकुल हातकणंगलेमध्येच होणार आणि त्याचा लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांनी क्रीडा संकुलासाठी आवश्यक असलेली जागा, त्यांचे ठराव व कायदेशीर बाबींची पूर्तता करून संबंधित प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली.