मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांना मोठे यश मिळाले आहे. राज्यातील युती सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. म्हत्वाचे म्हणजे, यात ‘सगे-सोयरे’ मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे.यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आला आहे.
मात्र यानंतर आता, ते नोटिफिकेशन नोटिस आहे, असे म्हणून एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन, मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत काय काय सुरू आहे, या सर्व गोष्टींसाठी लवकच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.”मला आज असे सांगायचे आहे की, माझे मराठा भाऊ, जे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभार्थी आहेत, त्या लाभापासून कुणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीने उभारलेले हे आंदोलन होते, असे मी समजतो.
मात्र, आज आपण ते नोटिफिकेसन बघितले, तर ते नोटिफिकेशन नोटिस आहे. म्हणून एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन, माननीय उच्च न्ययालयात लवकरात लवकर, म्हणजे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत काय काय सुरू आहे. या सर्व गोष्टींसाठी लवकच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल,” असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.