लोकसभा उमेदवारीसाठी सगळेच आशेवर…..

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. दोन्हीही मतदारसंघात जर तरच्या गोष्टींचा तर्क वितर्क लढवला जात आहे.

अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार लांघ बांधून आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. इच्छुकांकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा केला जातोय. मात्र, सर्वाना झुलत ठेवून आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत कोणाचा गेम होणार याचीच चर्चा जास्त रंगली आहे.