इचलकरंजीतील बेकायदेशीर ॲकॅडमींवर कारवाईची मागणी…

इचलकरंजी शहरातील बेकायदेशीर शैक्षणिक ॲकॅडमींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात दिले. विद्यार्थी शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश दाखवून दिवसभर ॲकॅडमीमध्ये शिकत असतात. यातून एक प्रकारची शासनाची फसवणूक होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर ॲकॅडमीवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.