हातकणंगले-रुकडी दरम्यानचे रेल्वे फाटक २५ फेब्रुवारीपर्यंत बंद!

पुणे विभागातील हातकणंगले रुकड़ी स्थानकांदरम्यान चे रेल्वे किमी ३४/०- १ येथे असलेले रेल्वे फाटक क्रमांक २२ या ठिकाणी आवश्यक रस्ता आणि भिंत दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने हे रेल्वे फाटक बुधवार दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ ते रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत बंद राहील.
उपरोक्त कालावधीत रस्ता वाहतुकीला पर्याय म्हणून रेल्वे फाटक क्रमांक २० ( रोड ओवर ब्रिज जवळ) उपलब्ध असेल. यांची प्रवाशांनी नोंद घ्यावी.