सोलापूर येथे रड्डेच्या माळरानावर बैलगाडी शर्यतीचा थरार

स्व.आ.भारत भालके यांच्या 62 व्या जयंतीनिमित्त भालके फाउंडेशनच्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील रड्डेच्या माळरानावर पहिल्यांदाच बैलगाडा व म्हशी पळवण्याचा थरार या भागातील नागरिकांनी अनुभवला या स्पर्धेसाठी या भागातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.

लोकनेते स्व. भारत भालके फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, स्पर्धेसाठी अ गट,ब गट, दुसा चौस, आदत आणि घोडागाडी अशी विभागणी करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंद्रभागा कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत बेदरे, दामाजीचे संचालक दयानंद सोनगे, सुरेश कोळेकर, व्यंकट भालके दत्तात्रेय चौगुले पैलवान ज्ञानेश्वर भगरे वसंत गरंडे, दादा दौलतोडे,दादा गरंडे,नामदेव जानकर,नितीन पाटील, गुलाब थोरबोले,दौलत माने, राजाराम बाबर ,अजित यादव आदीसह बैलगाडा शर्यतीसाठी आलेले स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.