माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी…..

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे एक अनोखा आणि प्रेरणादायी विचार शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वांपुढे उभा राहिलेला आहे. एका निवारा नसलेल्या कार्यकर्त्याला आज स्वतःचे एक निवासस्थान माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी करून दिलेले आहे. काल शिवजयंतीच्या दिवशी निवारा नसलेल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे आपल्या स्वतःच्या घरामध्ये गृहप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एका उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला आपल्या हक्काचं घर दिलेल आहे.

गेल्या दीड दोन वर्षांमध्ये नवनाथ मोरे नावाचा धनगर समाजाचा एक गरीब कार्यकर्ता रोजगारावर आपलं पोट भरत होता.अनेक कार्यक्रमांच्या वेळी व्यासपीठावर एक चांगला वक्ता म्हणून नवनाथ मोरे यांची ख्याती आहे. म्हणून थोडक्यात कालावधीमध्ये नवनाथ मोरेने संपूर्ण तालुक्यामध्ये लोकप्रियता मिळवली होती.

काही विकास कामांच्या बोलण्यासाठी शिरगावचे काही मंडळी दीपक आबांच्या भेटीला आलेले असताना त्यांनी नवनाथ मोरे हा आमच्या शिरगाव मधील धनगर समाजाचा एक गरीब कुटुंबातील कार्यकर्ता आहे परंतु त्याला राहण्यासाठी घर नाही अशी खंत त्यांनी आबांच्या समोर व्यक्त केली होती.

त्यावेळी दीपक आबांनी राष्ट्रवादींच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यावेळी त्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी मिळून प्रमुख नेत्यांनी निधी गोळा करून या कार्यकर्त्याला एक घर बांधून द्यायचे असा निर्णय झाला.

म्हणजेच आपला कार्यकर्ता एखाद्या झाडाखालील खोपट्यात राहण्यापेक्षा त्याला निवारा करून देण्याचा त्यावेळेस संकल्प सर्व प्रमुख नेते मंडळींनी केला.अनेक जणांनी यासाठी मदत देखील केली आणि आज नवनाथ मोरे याचे स्वतःचे घर उभे झालेले आहे.