सध्या अनेक भागातील वेगवेगळ्या समस्या या असतातच. त्या समस्या अनेक वेळा दूर देखील केल्या जातात तर काही समस्यांवर तोडगा न निघाल्याने आंदोलन अनेक भागात केले जातात. आष्टा शहरात सिटी सर्व्हे नंबर ७४७ येथे २० जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या योजनेतून बगीचा कामाच्या विकास काम नगरपालिकेने दिलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे न केल्याम ुळे मातंग समाजाचे दफन केलेली प्रेत उकरून काढून व त्या ठिकाणच्या संतश्रेष्ठ श्री सदगुरू संत सतबुवा महाराज मठाचे फौंडेशन तोडले व दफन केलेले मृतदेह बाहेर काढलेचा आरोप करीत सदर काम करणाऱ्या ठेकेदार, सब ठेकेदार व त्यांना पाठीशी
घालणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करावा अशी मागणी करीत उपोषणाला बसले.
उपोषणकत्यांनी असा आरोप केला आहे की, सुहास नितीन माळी याने दफन प्रेतांची हाडे उखरून काढली आहेत. हे काम उदय पाटील यांच्या नावाची वर्क ऑर्डर असताना ह्या सुहास नितीन माळी याचा ह्या कामाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना त्याने गावातील गुंडाच्या जोरावर सदरच्या ठिकाणची दफन भूमी उदवस्त केली आहे. प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी.
दरम्यान याबाबत दुसऱ्या गटाने बगीचा विकास कामाचे समर्थन करीत जे ह्या कामाला विरोध करीत ते ठेकेदाराकडे खंडणी मागत आहेत असा आरोप करीत संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या गटाने तहसील व पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे समाजातील नागरिकांना काही लोक स्वार्थापोटी विकासकाम मध्ये अडथळा निर्माण करीत विकास कामांच्या संबंधित ठेकेदार कडून खंडणी मागत आहेत. कॉन्ट्रॅक्टर सुहास निवास माळी यांना खंडणी मागून समाजाला बदनाम करत आहेत. संबंधीत लोकांवर कारवाई करावी.
अण्णाभाऊ साठे नगर आष्टा येथील मातंग समाज वस्ती नजीक असणाऱ्या स्मशानभूमीजवळ नगरपरिषदेच्यावतीने सुरू असलेल्या बगीच्या कामाच्या विकास कामावरून मातंग समाजात दोन गट पडले आहेत. एका गटाने वर्क ऑर्डर प्रमाणे काम होत नसल्याचा तसेच समाजाच्या भावना दुखवल्याचा आरोप करीत विरोध करीत स्मशानभूमीतच बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. तर दुसऱ्या गटाने या कामाचे समर्थन करत पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले. एका गटाने पालिकेचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर दुसऱ्या गटाने अॅट्रॉसिटीची मागणी करणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
