रविवारी पेठ येथे क्रिकेट स्पर्धा

जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन गावागावात केले जाते. पेठ (ता. वाळवा) येथे जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल पाटील मित्र परिवारातर्फे जयंत चषक २०२४ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

उद्या म्हणजेच रविवारी (दि. २५) स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा १४ वर्षांखालील मुलांसाठी आहे. प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार रुपये व चषक आहे. द्वितीय दहा हजार व चषक असे बक्षिसाचे स्वरूप आहे. कृषी महाविद्यालय, इस्लामपूर वाघवाडी रोड येथे या स्पर्धा होणार आहेत.