अशोक सराफ आणि रुतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार

 मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा केंद्र सरकारतर्फे त्यांना बहुमान मिळणार आहे. संगीत नाटक अकादमीतर्फे (Sangeet Natak Academy) दिल्या जाणाऱ्या​फेलोशिप आणि पुरस्कारांच्या यादीत अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. यांसोबतच विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali), अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe), ढोलकीवादक विजय चव्हाण (Vijay Chavan) यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला, इतर पारंपरिक समूह नृत्य, आदिवासी नृत्य क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित केले जाते. विविध कलाक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणारा हा एक सर्वोच्च भारतीय सन्मान आहे. काल रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश आहे.