केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली.मीडिया रिपोर्टनुसार, नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता नव्या वर्षात जारी केला जाणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे फेब्रुवारी महिन्यातच नमो शेतकरीचा पुढील हप्ता म्हणजे 6वा हफ्ता देखील शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आणि पीएम किसानचा अठरावा हप्ता एकाच दिवशी पात्र शेतकऱ्यांना मिळाला होता.
5 ऑक्टोबर 2024 ला या दोन्ही योजनांचे 4000 रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हफ्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये सोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या दोन्ही योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. यामुळे, ऑक्टोबर महिन्यात या योजनेचे पैसे मिळाले असल्याने आता फेब्रुवारी 2025 मध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.